Disha Social Foundation : राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांची रंगली गप्पांची मैफील

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील (Disha Social Foundation) सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी नेहमीचे हेवेदावे बाजूला ठेवून रविवारी (23  ऑक्टोबर) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा आनंद घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’ या ठिकाणी दिवाळी फराळ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अर्जून पुरस्कार विजेते खेळाडू शांताराम जाधव, नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचीव सचिन साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, भाजप नेते शंकर जगताप, कार्तिक लांडगे, माजी महापौर संजोग वाघेरे, राहूल जाधव, नितीन काळजे, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, चेतन भुजबळ, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, अमित गावडे, विक्रांत लांडे, अभिषेक बारणे, सुरेश भोईर, धनंजय काळभोर, बाळासाहेब मोरे, संदीप चिंचवडे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, नाट्यव्यवस्थापक समीर हंपी, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, डॉ. पंडित शेळके, प्राचार्य नितीन घोरपडे, निवेदक वि. दा. पिंगळे, श्रीकांत चौगुले, डॉ. विनायक पाटील, डॉ. रोहन काटे, डॉ. श्रीकृष्ण जोशी आदींनी हजेरी (Disha Social Foundation) लावली. दोन तास रंगलेल्या या मैफिलीत उपस्थित मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन संतोष निंबाळकर यांनी केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. गोरख भालेकर, सचिन साठे, संतोष बाबर, राजेंद्र करपे आदींनी संयोजनात पुढाकार घेतला.

Pune Festival : दिवाळीनिमित्त पुणे ते दानापूर फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.