Sahyadri Pratishtan : सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठानच्या (Sahyadri Pratishtan) वतीने भोसरी येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. भोसरी येथील लांडेवाडी चौकातील शिवछत्रपती स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. या चौकामध्ये रायगड किल्ल्याची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. तसेच, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. संपूर्ण स्मारकावर सायंकाळी दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.

सह्याद्री प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहरने भव्य दीपोत्सव सोहळा 2022 ‘एक दिवा हिंदवी स्वराज्याच्या चरणी…’ आयोजित केला आहे. हा दीपोत्सव 21 ते 25 ऑक्टोबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणावरील शिवछत्रपतींच्या स्मारक जवळ दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

क्रांतिवीर चाफेकर बंधू स्मारक, चाफेकर चौक, चिंचवड येथे आज दीपोत्सव (Sahyadri Pratishtan) साजरा झाला.
शिवछत्रपती स्मारक, तळवडे चौक येथे रविवारी, 23 ऑक्टोबरला दीपोत्सव साजरा होणार आहे.
शिवछत्रपती स्मारक, मामुर्डी गाव, देहूरोड येथे सोमवारी, 24 ऑक्टोबरला दीपोत्सव साजरा होणार आहे.
शिवछत्रपती स्मारक, पिंपरी ते मंगळवारी, 25 ऑक्टोबरला दीपोत्सव साजरा होणार आहे.

Disha Social Foundation : राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांची गप्पांची मैफील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.