Pune Festival : दिवाळीनिमित्त पुणे ते दानापूर फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

एमपीसी न्यूज : प्रवाशांच्या सोयीसाठी (Pune Festival) दिवाळीनिमित्त पुणे- दानापूर- पुणे दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गाडी क्र. 01407 पुणे – दानापूर एक्स्प्रेस मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी पुण्याहून सकाळी 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.00 वाजता दानापूरला पोहोचेल. गाडी क्र. 01408 दानापूर – पुणे एक्सप्रेस दानापूरहून बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला दुपारी 4.30 वाजता पोहोचेल. या गाडीला 14 जनरल डबे असतील.
गाडी क्र. 01409 पुणे – दानापूर एक्सप्रेस बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी पुण्याहून सकाळी 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता दानापूरला पोहोचेल. गाडी क्र. 01410 दानापूर – पुणे एक्स्प्रेस दानापूर येथून गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.30 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला 3 AC II, 06 AC 3, 05 स्लीपर आणि 04 जनरल डबे असतील.
वाटेत या गाड्या दौंड कार्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा (फक्त ट्रेन क्र. 01408, 01410 साठी), इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्टेशन येथे थांबतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ (Pune Festival) घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.