Diwali : दिवाळीच्या पूर्वसंध्येला रंगली सुरांची मैफिल

एमपीसी न्यूज : दिपावलीच्या (Diwali) पुर्वसंध्येला हिंदी व मराठी गीतांची सुमधूर मैफिल असलेला तेजोमय ‘रंगोली दीपसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब ॲाफ भोजापूर गोल्ड तसेच भोसरी येथील डॅा. साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

सत्यम शिवम सुंदरम, परदेशी या, ये मेरी जोहर जबी, मेरी देश की धरती याबरोबरच एकाच या जन्मी, पैल तोगे काऊ कोकताहे, या जन्मावर, चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा ही लावणी डॅा. अनघा काळे राजवाडे आणि गायक संजय मरळ यांनी सादर केली. स्वाती मोडक यांनी निवेदनातून प्रत्येक गाण्याचा इतिहास जिवंत केला.

कार्यक्रमासाठी लायन्स क्लबच्या (Diwali) अध्यक्षा जयश्री साठे, सचिव तृप्ती शर्मा, खजिनदार शोभा फटांगरे, रविंद्र सातपूते, सुदाम भोरे, सुदाम मोरे, लायन मुरलीधर साठे, लायन मुकुंद आवटे, लायन अरुण इंगळे, लायन डॅा. रोहीदास आल्हाट, डॉ.  विलास साबळे, सुरेखा साबळे, डॅा. शंकर गायकवाड, नागेश वसतकर, विठ्ठल खेसे, नंदा फुगे, ज्ञानेश्वर सावंत, सुभाषचंद्र भोसले, प्रा. दिगंबर ढोकले आदी उपस्थित होते.

Sassoon Hospital : ससून सर्वोपचार रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.