Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये; रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

एमपीसी न्यूज : दिवाळीची सुट्टी असल्याने (Pune News) पुणे, पिंपरी चिंचवड शहरे तसेच जिल्ह्यातील इतर भागातून नागरिक आपल्या गावी किंवा पर्यटन स्थळी जात आहेत. त्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या ट्रेन्समधून जाण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पुणे रेल्वे स्टेशनवर होत आहे. तसेच त्यांना सोडण्यासाठी त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक व मित्र त्यांच्यासोबत येत आहेत. त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे.  
पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी रोखण्यासाठी सध्या दिनांक 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिट रू. 10 /- वरून वाढवून रु.30/- दराने देण्यात (Pune News) येतील. लोकांना विनंती करण्यात येते, की स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.