Markal Road : मरकळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज : आळंदी ते लोणीकंद फाट्यापर्यंत (Markal Road) संततधार पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहनांना रहदारी करत असताना मोठी अडचण निर्माण होत होती. येथील सर्व गोष्टी जाणून घेऊन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या रस्त्यासाठी तातडीने पाठपुरावा सुरु केला होता. यामुळे आळंदी मरकळ लोणीकंद रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीमार्फत येथे कधी काम सुरू होणार? या प्रतिक्षेत या भागातील नागरिक आहेत.

बहुत करून सोळू ते लोणीकंद फाट्यापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मोठे खड्डे पडलेले दिसून येत होते. दि.23 ऑक्टोबर रोजी मरकळ रस्त्यावरील ठीकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांमध्ये मुरूम टाकत ते खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनामार्फत चालू होते. तसेच, सोळू येथे काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम दिसून आले. येथील रस्त्याची बरेच वर्ष बिकट अशी दुरवस्था होती. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर या धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या इतक्या महत्त्वाच्या या रस्त्याची ही दुरावस्था (Markal Road) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही पाहवत नव्हती.
येथील सर्व गोष्टी जाणून घेऊन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या रस्त्यासाठी तातडीने पाठपुरावा सुरु केला होता. यामुळे आळंदी मरकळ लोणीकंद रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीमार्फत येथे कधी काम सुरू होणार? या प्रतिक्षेत या भागातील नागरिक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.