Pune News : मन की बात सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मन की बात ऐका : खा.डॉ.अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज : केंद्रसरकार अस्थिर करण्यासाठी परकीय शक्तींचा शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे हात असल्याचा आरोप हास्यास्पद आहे. त्यांनी मन की बात सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकावे, असा टोमणा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी लगावला.

पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) येथे एका बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना खा.कोल्हे म्हणाले, गेल्या दिड महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. तरीही केंद्रसरकार तोडगा काढत नाही. उलट या आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात आहे.

केंद्रातील सरकार अस्थिर करण्याचा हा डाव असल्याचे हास्यापद आरोप करत आहेत. कृषीमंत्री तर म्हणाले येत्या एक ते दिड वर्षे हे कृषी कायदे स्थगित राहतील, मग त्यानंतर लागू होतील का हे समजत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मन की बात करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकावी अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.