Pune : पुण्यात रस्ता सुरक्षा जनजागृती विषयी शुभेच्छा पत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ च्या (आय.एम.ई.डी.)राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (Pune) (एन.एस.एस) वतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमध्ये महाविद्यालयातील एन.एस.एस विभागाचे विद्यार्थी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या 20 हजार शुभेच्छा पत्रांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे यांनी दिली.

या अभियानातंर्गत वाटण्यात येणारे हे ‘ शुभेच्छा पत्र’ मध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील 15 प्रमुख चौकांमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

Pimpri : पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवण्यात एच. ए. स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान – सुनील शिवले

चार चाकी वाहनात सीट बेल्ट लावणाऱ्या चालकांना तसेच हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकी स्वारांना 5 हजार चॉकलेट वाटली जाणार आहेत. अभियानाचे उद्घाटन 30 डिसेंबर (Pune) रोजी सकाळी 10 वाजता अलका टॉकीजजवळील चौकात होणार आहे. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी, आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ अजित मोरे, उप प्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ विजय फाळके, डॉ प्रमोद पवार आदी उपस्थित राहणार आहेत.भारती विद्यापीठ कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ विश्वजित कदम यांचेही मार्गदर्शन या मोहिमेला लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.