Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे वारक-यांना रेनकोट वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी क्रमांक 19 मधील वारक-यांना आषाढी‌‌ एकादशी निमित्त रेनकोट वाटप करण्यात आले. हा समारंभ इंदोरी येथील दिंडी समितीच्या कार्यालय प्रांगणात संपन्न झाला.

India News – राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती

पंढरपूर वारीच्या निमित्ताने मागील 20 वर्षे वारीशी निगडीत असणारे मावळ‌ पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीमत्व  रोटरी सिटीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष  ए.जी.रो.विलास काळोखे यांच्या सौजन्याने हा उपक्रम घेतला जातो. दिंडीचे प्रमुख‌ ह.भ.प.रविंद्र महाराज ढोरे यांनी सर्वांचे स्वागत केले, अध्यक्ष रो.दिपक फल्ले यांनी प्रास्ताविक केले, संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,मा.सभापती विठ्ठल शिंदे,मा.नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,मा.सरपंच रो.दिलीप ढोरे,रो.दिलीप पारेख रो.संजय मेहता मा.सरपंच रो.प्रशांत भागवत यांनी पालखी प्रस्थान प्रसंगी वारकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भंडारा डोंगर दिंडीचे प्रस्थान झाले.
मागील 20 वर्षे  सूरू असलेल्या स्तूत्य उपक्रमाचे‌ वारकरी बांधवांनी कौतुक केले.सेक्रेटरी सुरेश शेंडे,रो.संतोष परदेशी,रो.बाळासाहेब‌ रिकामे,रो.प्रदीप‌ टेकवडे,रो.प्रशांत ताये,रो.प्रदीप‌ मुंगसे,रो.तानाजी मराठे,रो.संजय‌ वाघमारे,रो.विश्वास कदम,राजू कडलक,संजय चव्हाण,रो.सुरेश दाभाडे,रो.राकेश ओसवाल,रो.रघुनाथ कश्यप इ.कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इंदोरी ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्लब सेक्रेटरी सुरेश शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.