India News – राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवार ( दि १० ) रोजी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. शरद (India News) पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना १९९९ साली केली होती व पार्टीच्या २५व्या वर्धापना दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला.

Alandi : माऊलींचे अश्व आळंदीमध्ये दाखल

शरद पवार यांनी मागच्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा ठराव समोर मांडला होता. परंतु पक्षाच्या कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांकडून निदर्शने बघून शरद पवारांनी हा निर्णय मागे घेतला होता. आता पक्षाच्या वर्धापनदिनी दोन कार्याध्यक्ष नेमले आहेत.

कार्याध्यक्ष म्हणून सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब तर पटेल यांच्याकडे गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानची जबाबदारी देण्यात आली. दोन्ही नेते लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात.  आगामी (India News) निवडणुका लक्षात घेऊन शरद पवार यांनी निवडणूक रणनीती म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रमुख नेत्यांचे मत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.