Alandi : माऊलींचे अश्व आळंदीमध्ये दाखल

 एमपीसी न्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी सोहळ्या करिता दि.31 मे रोजी अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान झाले होते. त्यांचे आज दि.10 जून रोजी आळंदी (Alandi) मध्ये आगमन झाले.

PCMC : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज

चालत आलेल्या पूर्वीच्या परंपरे प्रमाणे नदी पलीकडील जुन्या पुला जवळील गोपाळ कृष्ण मंदिर ,बिडकर वाड्या मध्ये प्रथम अश्वांनी विश्राम केला. शितोळे सरकारच्या वतीने अश्वांचा आगमनाचा निरोप देण्यात आला. यानंतर परंपरे प्रमाणे पालखी सोहळा मालक आरफळकर,विश्वस्त योगेश देसाई व इतर मानकरी सेवेकरी हे गुरू हैबतबाबांची दिंडी परंपरे प्रमाणे घेऊन सामोरे गेले.

सनई चौघड्यांनी त्यांचे आळंदीमध्ये (Alandi) स्वागत करण्यात आले.यावेळी वेशीवर अश्वांचा सन्मान करण्यात आला.यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार, उमेश बिडकर, योगीराज कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, राजाभाऊ चोपदार, रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, पृथ्वी पाटील व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.