Alandi : षट्तिला एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज दि.6 रोजी आळंदी येथे षट्तिला एकादशी ( Alandi ) निमित्त  संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शनासाठी माऊली मंदिरात  भाविकांनी गर्दी केली होती. माऊली मंदिरातील गाभाऱ्यात एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये भाविकांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Pune : विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी चौकशीसाठी समितीची नियुक्ती

अनेक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतना दिसून येत होते. नदी घाटावरती सुद्धा पवित्र इंद्रायणी मातेची पूजा करताना भाविक दिसून येत होते. मंदिर परिसरातील हार, फुले, प्रसादाच्या तसेच ग्रंथ ,साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत ( Alandi ) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.