Pune : विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी चौकशीसाठी समितीची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुण्यातील ललित कला रामायण प्रकरणाची सावित्रीबाई फुले विद्यापीठाने  गंभीर ( Pune) दखल घेत   चौकशीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

Talwade : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महारोग्यशिबिराचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 2 फेब्रुवारीला रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणातील पात्रांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.  यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.  या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती.

या प्रकरणी  आता  चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. विद्यापीठ प्रशासनाने स्थापन केलेल्या या चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे असणार असून समितीच्या इतर सदस्यांमधे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचाही समावेश करण्यात आलाय.

चौकशी समितीच्या इतर सदस्यांमधे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांचा समावेश आहे. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत चौकशी करून त्याचा अहवाल कुलगुरूंना सादर करणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या संबंधात विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्यात येत असून या संदर्भात विद्यापीठाने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले  आहे. विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत, विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

तसेच  विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही अडथळा येणार नाही, असे जाहीर आवाहन विद्यापीठाने केले ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.