PCMC : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होत आहे. शहराच्यावतीने या सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली.

Pune : प्रत्येक शिखर सर केल्यानंतर ‘तो’ द्यायचा ‘उत्तम आरोग्य अन निसर्ग संवर्धनाचा संदेश’

आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजनाबाबत संबंधित विभागांना त्यांनी सूचना दिल्या. पालखी सोहळा स्वागताचे व्यवस्थापन आणि नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या इंसिडेंट कमांडर तसेच इतर सर्व अधिका-यांना कामकाजाचे स्वरुप याबाबत सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.

जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा आणि मुक्कामाच्या स्थळाची पाहणी आयुक्त सिंह यांनी केली. पालखी मार्गाची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, मनोज सेठीया, प्रमोद ओंभासे, संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, थॉमस नरोन्हा, दिलीप धुमाळ, वासुदेव मांढरे, बापू गायकवाड, नितीन देशमुख, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विजयकुमार थोरात, उमेश ढाकणे, अमित पंडित, शितल वाकडे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.

स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पालखी मार्गाची सुरुवात निगडी येथील भक्ती शक्ती येथून करण्यात येते याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणा-या व्यवस्थेची पाहणी आयुक्त सिंह यांनी केली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो. या ठिकाणची पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली.

आकुर्डी येथील अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय, वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा येथे दिंड्यांचा मुक्काम असतो या शाळांची पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका तसेच झाडांच्या बीया, पुष्पहार आणि नारळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या (PCMC) वतीने राबविण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.