Pimpri : संत नामदेव महाराज पालखी सोहळा आणि आरोग्य शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पिंपरी – चिंचवड (Pimpri) नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने शनिवार (दि.15) रोजी सकाळी दहा वाजता भव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सुमारे 900 भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Wakad : रिक्षा चालकाकडून 50 रुपयांसाठी प्रवासी महिलेला दमदाटी

श्री मोरया गोसावी मंदिर – गांधी पेठ – चापेकर चौक – वाल्हेकरवाडी रस्ता – संत नामदेव चौक – साठे मळा – संत नामदेव महाराज मंदिर, चिंचवड या मार्गाने नूतन अन् सुंदर पालखीमध्ये नामदेव महाराजांच्या पादुका ठेवून, टाळमृदंगाच्या नादात फुगड्या खेळत अन् नर्तन करीत अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात मिरवणूक संपन्न झाली. या सोहळ्यात खास आळंदी येथून 28 बालवारकऱ्यांचे पथक सहभागी झाले होते;

या सोहळ्याच्या निमित्ताने नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्था, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, साठेमळा, वाल्हेकरवाडी रस्ता येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

डॉ. प्रवीण बढे आणि त्यांच्या वैद्यकीय समूहाकडून मधुमेह, संधिवात, हृदयविकार, नेत्रविकार, मूळव्याध, महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यसमस्या संबंधित मोफत तपासणी आणि सल्ला शिबिराचा सुमारे 100 रुग्णांनी लाभ घेतला.

शिबिरासाठी पिंपरी (Pimpri) – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते, नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष कैलास नेवासकर, उज्ज्वला सावंत, बापूसाहेब काळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सायंकाळी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.