Chinchwad : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेकडोजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्या दरम्यान चोऱ्यामाऱ्या (Chinchwad) रोखण्यासाठी काही गुन्हेगारांना तसेच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच काही जणांना पालखी मार्गस्थ झाल्यानंतर सोडून देण्यात आले. यात संशयावरून दीडशे जणांना आळंदी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. त्यावरून पोलिसांवर आरोप करण्यात आले.

 

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यात अनेकांना त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज, दागिने, मोबाइल याचे भान राहत नाही. याचाच गैरफायदा घेऊन चोरटे चोरी करतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही संशयिताना ताब्यात घेण्यात येते. यंदा देहू आणि आळंदी येथे अशा प्रकारे दीडशेपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले होते. यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही काही जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या रोखण्यात मदत झाली.

 

Vadgaon Maval : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

 

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानसोहळ्यावेळी विशिष्ट समाजातील अनेकांना पोलिसांनी पकडले. त्यांना रविवारी दिवसभर आळंदी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यांना पोलिसांनी का पकडले, कशाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली, असे प्रश्न ॲड. असिम सरोदे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच पोलिसांची ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारे महिला, पुरुषांना पकडून मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले, असा प्रश्नही केला आहे. पकडलेल्यांना त्वरित सोडून देण्याची मागणीही सरोदे (Chinchwad) यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.