Today’s Horoscope 12 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – सोमवार

12.06.2023.

 शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 13.50 पर्यंत नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रातील काही मनाविरुद्ध घटना तुमच्या मनाला बेचैन करतील. कोणीही दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. विश्वासू माणसाकडूनच विश्वासघात होईल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम )

आजचा दिवस तुम्हाला सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. व्यावसायिक अडचणींवर सहजच मात करू शकाल. आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

मिथुन ( शुभ रंग- केशरी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. अनेक किचकट कामे आज सहजच मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही खोटी स्तुती करणारे भेटतील. कुठल्याही मोहात अडकू नका.

कर्क (शुभ रंग- मरून.)

आज एखाद्या धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील. यथाशक्ती दानधर्मही कराल. आज आपल्या कुवती बाहेर कोणतीही जबाबदारी स्वीकारू नका नाकासमोर चालणेच हिताचे राहील.

सिंह (शुभ रंग- मोरपंखी )

मोठ्या आर्थिक उलाढाली उद्यावर ढकलल्यात बरे होईल. आज आपल्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा देऊ नका. वाहन चालवताना गाणे गुणगुणू नका.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

व्यावसायिकांना वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी सिद्ध रहावे लागेल. काही नाती जपायची असतील तर आज स्पष्ट बोलण्यापेक्षा ही गोड गोड बोलणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- लाल)

नोकरीच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी असल्या तरी त्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत. काळजी घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)

आज आपले काही आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. आज प्रेमप्रकराणे फुलतील बहरतील.

धनु- (शुभ रंग- निळा)

आज तुम्हाला रुटीन कामाचा कंटाळा येईल. आज कर्तव्यापेक्षाही मौजमजेस तुम्ही प्राधान्य द्याल. किमती वस्त्र खरेदी कराल. आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायातील स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल तर जाहिरात वाढवावी लागेल. काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

सर्व दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभागात राहील. व्यवसायातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. आशादायी दिवस.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी )

आज तुम्ही एखादी गोष्ट फार मनाला लावून घ्याल. नोकरीच्या ठिकाणी बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.