Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी चे पंढरपूर कडे प्रस्थान

एमपीसी न्यूज- आज दि.12 जून रोजी आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या (Alandi) पालखी रथाचे सकाळी सव्वा सहा वाजता लाखो वारकरी भविकांसह माऊली माऊली च्या जयघोषात ,हरिनामाच्या गजरात व  भक्तिमय वातावरणात पंढरपूर कडे प्रस्थान झाले.यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती.

Today’s Horoscope 12 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार,श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार ,सोहळा मालक आरफळकर,बैल समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील,विश्वस्त विकास ढगे पाटील,विश्वस्त योगेश देसाई,बैलजोडीचे मानकरी तुळशीराम भोसले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे , मच्छिंद्र शेंडे, जालिंदर जाधव ,ग्रामस्थ  खांदेकरी, मानकरी, सेवेकरी वर्ग, आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील गावकरी  (Alandi) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.