Chakan : चाकणमध्ये शांतता समितीची बैठक

एमपीसी न्यूज-राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या घटनांच्या (Chakan) पार्श्वभूमीवर येथील चाकण पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी शहरात शांतता ठेवण्याचे व कुठल्याही संशयास्पद घटनांच्या बाबत पोलिसांना सूचित करण्याचे आवाहन केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यावेळी म्हणाले कि, चाकण मध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.  परप्रांतीय व राज्यातील अन्य भागातील लोक चाकणमध्ये रहिवासास आहेत.  औद्योगीकरणामुळे नागरीकरण वाढत आहे . बाहेरून आलेल्या असामाजिक प्रवृत्ती काही अप्रिय घटना जाणीवपूर्वक घडवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन शिंगारे यांनी यावेळी केले.

Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी चे पंढरपूर कडे प्रस्थान

चाकण पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस शिवसेनेचे नितीन गोरे, चाकण माजी उपसरपंच व भाजपचे कालिदास वाडेकर, राजन परदेशी, अमृत शेवकरी, किरण झिंजुरके, अनिल सोनवणे, नसरुद्दिन इनामदार, राहुल वाडेकर, कॉंग्रेसचे जमीर काझी, निलेश कड पा., आनंद गायकवाड, अमोल जाधव , राष्ट्रवादीच्या संध्या जाधव, अनिल देशमुख , आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे  पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

असामाजिक प्रवृतींवर लक्ष 

चाकण पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सर्वपक्षीय सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर कुठेही जातीय तेढ नाही. शहरात सलोखा आहे.  कुठलाही वाद नाही किंवा कुठलाही धार्मिक तेढ नसल्याचे यावेळी पोलीस अधिकार्यांना सांगितले. मात्र रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या असामाजिक प्रवृत्तींवर लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांना करण्यात आले. सामाजिक सलोखा भंग करण्यचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्ष, जाती धर्माच्या व्यक्तीवर तातडीने उचित कारवाई पोलिसांनी करावी आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर आहोत अशी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी  ग्वाही पोलिसांना दिली (Chakan) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.