Vadgaon Maval : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त (Vadgaon Maval ) वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात 76 जणांनी रक्तदान केले. तसेच यावेळी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पंचमुखी महाराज मंदिर प्रांगणामध्ये पार पडला.

यावेळी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे,जेष्ठ नेते, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, नगरसेवक राजेंद्र कुडे,सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे,रूपाली खैरे,प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, मिनाक्षी ढोरे, आरती राऊत, सुधा भालेकर, प्रियांका खैरे,वडगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रकाश कुडे, माजी सरपंच पोपटराव वहिले, माजी उपसंरपच पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, राजेश बाफना, शहराध्यक्ष प्रविण ढोरे, किसनराव वहिले, गंगाराम ढोरे, मंगेश काका ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुरेश कुडे, सुधाकर वाघमारे, चंद्रकांत राऊत, लक्ष्मण ढोरे, दिलीप वहिले,रोहिदास गराडे,काशिनाथ भालेराव, सोमनाथ धोंगडे, तुषार वहिले, प्रमोद वहिले, शरद ढोरे, गणेश ढोरे,अफताब सय्यद, शैलेश वहिले,गणेश वायकर, भाऊसाहेब ढोरे,अजय भवार,सौरभ सावले, मयुर गुरव, सिद्धेश ढोरे, गणेश पाटोळे, आशिष भालेराव, अभिजीत ढोरे, कैलास पाटोळे, संदीप भालेराव, गणेश सुतार, प्रणव ढोरे, केदार बवरे, मयुर वाघमारे, रतिश वाघमारे उपस्थित होते.

Maharashtra : माझ्यावर ‘या’ पदाचे दडपण आले आहे- सुप्रिया सुळे 

या स्तुत्य उपक्रमास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश खांडगे, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी शुभेच्छा दिल्या व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे असे आवाहन केले.

आधार रक्त संकलन केंद्र, पुणे येथील सर्व डॉक्टर्स टीम यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन नगरसेविका पूजा वहिले, नगरसेवक मंगेश खैरे, माजी उपसरपंच विशाल वहिले यांच्या (Vadgaon Maval ) वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.