Maharashtra : माझ्यावर ‘या’ पदाचे दडपण आले आहे- सुप्रिया सुळे 

एमपीसी न्यूज – माझ्यावर कालच कार्यकारी अध्यक्ष (Maharashtra ) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून आजपर्यंत अनेक वर्ष शरद पवार साहेब हे काम पाहत आले आहेत.आता प्रफुल्ल पटेल आणि माझ्यामध्ये या कामाचे विभाजन करण्यात आले आहे.पण माझ्यावर या पदाचे दडपण आले असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवली.त्यानंतर काल सुप्रिया सुळे या पुणे दौर्‍यावर असताना.धनकवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांचा विशेष सत्कार केला.त्यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक आप्पा रेणुसे,माजी नगरसेवक विशाल तांबे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Nigdi : तुकोबांच्या पालखी सोबत चालले 250 पोलीस

 

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन काल साजरा केला.या संपूर्ण कालावधीत लाखो कार्यकर्ते घडले आणि ते सर्वजण पक्षाच्या सोबत राहिले.त्या सर्वांचे मी आभार मानते.त्याचबरोबर या 24 वर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये राहिला आहे.हे सर्व तुम्हा कार्यकर्त्यांमुळे शक्य झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आपल्यातील काही नेत्यांना नोटिसा पाठवून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्या विरोधात आपण सर्वजण लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्याच्या मार्गाने चालत आहे.त्यामुळे 2024 हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा विकास आघाडीच वर्ष असणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

तसेच ते पुढे म्हणाले की,आज जरी माझ्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तरी देखील यापुढील काळात माझ्यासह सर्वांना पवार साहेब,प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांच काम राजकीय जीवनात काम करताना मार्गदर्शन लाभणार आहे.त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना  (Maharashtra ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.