Nigdi : तुकोबांच्या पालखी सोबत चालले 250 पोलीस

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र देहू येथून आकुर्डीपर्यंत (Nigdi ) पालखीसोबत 250 पोलीस देखील पायी चालत आले. पालखीतील चोऱ्यामार्‍यांना काळा बसविण्यासाठी पोलिसांनी ही उपाययोजना केली होती. यामुळे पालखीतील चोऱ्यामाऱ्यांना आळा बसला असून वारकऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना देखील निर्माण झाली.

रविवारी सकाळी देहू येथील इनामदार वाड्यात शासकीय महापूजा झाली. यावेळी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायक आयुक्त डाॅ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, डाॅ. काकासाहेब डोळे, शिवाजी पवार, सहायक आयुक्त पद्माकर घनवट, विठ्ठल कुबडे, सतीश कसबे, बाळासाहेब कोपनर यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक देखील पालखी सोहळ्यात सहभागी झाले.

Alandi : माऊली माऊलीच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

महापूजेनंतर पालखी देहू गावातून पिंपरी चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ झाली. रविवारी सायंकाळी पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पोहोचली. देहूगाव येथून आकुर्डी पर्यंत पालखीच्या भोवती 250 पोलिसांचे सुरक्षा कवच लावण्यात आले होते. पालखी सोहळ्यात हौसे, नवसे आणि गवसे अशा प्रकारचे लोक सहभागी होतात.

काही जण भक्ती भावाने पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. तर काही चोऱ्या माऱ्या करण्यासाठी येतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यावर्षी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या. त्यामध्ये पालखीचा भोवती खाकीतील 250 पोलिसांचे सुरक्षा कवच तयार केले. त्याचबरोबर पालखी सोहळ्यामध्ये साध्या वेशातील पोलीस देखील तैनात (Nigdi ) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.