Alandi : माऊली माऊलीच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज – माऊली माऊलीच्या जयघोषात माऊलींच्या (Alandi) पालखीचे दि.11 जून रोजी सायंकाळी पावणेसात वाजता प्रस्थान झाले. तदपूर्वी सायंकाळी पाच वाजता माऊलींच्या अश्वांचे मंदिरात आगमन झाले. माऊलीचे अश्व मंदिर प्रदक्षिणा घालत मंदिरा बाहेर प्रवेश झाला. मंदिरामध्ये मान्यवर मानकऱ्यांचा यावेळी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

 

Alandi : आळंदी मधील ‘त्या’ घटनेवर पोलीस आयुक्त म्हणाले ….

 मंदिरामध्ये श्रींची आरती झाली. त्यानंतर वीणा, टाळ, मृदंग, टाळ्यांच्या गजरात,माऊलींच्या पालखीवर पुष्प वृष्टी करत , माऊली माऊली च्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले .माऊलींच्या पालखीची मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर तीने आजोळघराकडे प्रस्थान केले.
दि. 11 जून आजचा मुक्काम देऊळ वाड्यातील आजोळघरी आहे. उद्या दि.12 ला आजोळ घरातून(आळंदीतून) सकाळी  माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल.

यावेळी प्रस्थान सोहळ्या श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार, पालखी सोहळा मालक आरफळकर, विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, अभय टिळक, तुकाराम माने व माऊलींचे मानकरी,खांदेकरी, सेवेकरी वर्ग, वारकरी  उपस्थित होते. तसेच शासकीय विविध वरिष्ठ आधिकारी व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी या समयी सदिच्छा भेट दिली. प्रदक्षिणा रस्त्यावर पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त मोठ्या संख्येने वारकरी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.