Nigdi : एसपीएम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांनी साजरी केली दीप अमावस्या

एमपीसी न्यूज – निगडीतील यमुनानगरमधील (Nigdi) एसपीएम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल आषाढ अमावस्या निमित्त आज (सोमवारी) दीपपूजन उत्साहात साजरे करण्यात आले.

याप्रसंगी खास विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना निमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांनी आपले खरे मार्गदर्शक म्हणजेच आपले आजी आजोबा यांचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे औक्षण केले त्यावेळेला आजी आजोबा भारावून गेले होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बक्षी यांनी दीप पूजन आणि आजी आजोबांचे स्वागत केले. आपल्या नातवंडांच्या शाळेत आजी आजोबा प्रथमच आले असल्यामुळे ते अतिशय खूष होते.

Wakad : रिक्षा चालकाकडून 50 रुपयांसाठी प्रवासी महिलेला दमदाटी

दीप पूजनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांचे (Nigdi) प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दिव्यांची माहिती सांगण्यात आली. स्नेहल देशपांडे यांनी अतिशय सुमधुर आवाजात दिव्याची प्रार्थना म्हटली. शोभा जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर साक्षी सांगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.