Chandrayaan 3 : पृथ्वीभोवती तिसऱ्या कक्षेत यानाचा प्रवेश

एमपीसी न्यूज – चंद्रयान 3 चे (Chandrayaan 3) शुक्रवारी (14 जुलै 2023) अवकाशात प्रक्षेपण होताच काही मिनिटातच यानाने पहिल्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता हे यान तिसऱ्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले असून सर्व भारतीयांची आता उत्कंठा वाढू लागली आहे.

Nigdi : एसपीएम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांनी साजरी केली दीप अमावस्या

https://twitter.com/isro/status/1680239822110162944?t=t1gy-TIBHZnuClEjH_EFCA&s=19

 

चंद्रयान 3 मोहिमेबाबत प्रत्येक नवीन माहिती इस्रोतर्फे जाहीर केली जात आहे. शनिवारी (15 जुलै 2023) या यानाने दुसऱ्या कक्षेत परिक्रमा सुरू केली होती. या यानाने पृथ्वीपासून जास्तीत जास्त 41762 किमी व कमीतकमी 173 किमी अंतराच्या कक्षेत परिक्रमा पूर्ण केली.

 

https://twitter.com/isro/status/1680845817903722497?t=yAN3Vv9deuMUYQbY8sqZvw&s=19

 

आज सोमवारी (17 जुलै 2023) चंद्रयान 3 ने तिसऱ्या कक्षेत परिक्रमा सुरू केली आहे. हे यान या कक्षेत पृथ्वीपासून जास्तीत जास्त 41603 किमी आणि कमीत कमी 226 किमीच्या कक्षेत त्याची परिक्रमा पूर्ण करेल. त्यानंतर यान पुढील कक्षेत पाठवण्याकरिता यानातील इंधनाच्या साहाय्याने प्रज्वलन केले जाणार आहे.

 

हे प्रज्वलन उद्या मंगळवारी (18 जुलै 2023) दुपारी 2 ते 3 दरम्यान केले जाणार आहे. यानंतर चंद्रयान 3 चौथ्या कक्षेत आपली परिक्रमा सुरू करेल. 24 ऑगस्ट रोजी विक्रम लॅंडर चंद्राच्या जमिनीवर उतरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.