Dighi : पोलिसांनी वाचवले रथाखाली आलेल्या महिलेचे प्राण; दोन पोलीस जखमी

पोलीस आयुक्तांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूर येथून आळंदी येथे परत येत असताना वडमुखवाडी येथे एक महिला पालखीखाली आली. तिला वाचवताना पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदार जखमी झाले. त्यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Chakan : घरफोडी करून 50 हजारांचा ऐवज चोरीला

आषाढी वारी झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला. पालखी बुधवारी (दि. 12) दिघी (Dighi) पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पालखी मार्गावर बंदोबस्त तैनात केला होता.

वडमुखवाडी येथे पालखीचे दर्शन घेत असताना एक भाविक महिला खाली पडली. ती महिला पालखीच्या रथाखाली येत असताना बंदोबस्तावर असलेले प ओलीस शिपाई रवींद्र पाठे आणि पोलीस शिपाई राहुल कारंडे यांनी महिलेला रथाच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले.

या घटनेत दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. दोघांना सुरुवातीला वडमुखवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कारंडे यांना थेरगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दोघांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीची मदत देखील जाहीर केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.