Pimpri : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव (Pimpri) येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीवर पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

MPC News Special : कुंडमळ्यातील बंधारा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर  टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.11 ह.भ.प.सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.221 ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.197 ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे व मुख्य पालखी सोहळ्यासोबत असे चार  पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत.

या टँकरचे पूजन पिंपळे गुरव येथे करण्यात आले. यावेळी संतासेवक, ह ,भ ,प ,मारुती ज्ञानोबा कोकाटे अध्यक्ष: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर  महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ह.भ. प. तांदळे महाराज, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, शशिकांत महाराज कुलकर्णी, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक नाना काटे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप अण्णा जोगदंड  प्रा.गणेश ढाकणे, रवींद्र  जाधव अमोल नागरगोजे, अमोल लोंढे, विकास आघाव, सुरेश कंक, त्रिमुख यलुरे, गोरक्ष सानप, हनुमंत घुगे, प्रभाकर साळुंके, उमाकांत तलवाडे, धनराज धायडे, राजू रेड्डी, किशोर अट्टरगेकर, म्हाळप्पा म्हेत्रे, अनिल पाटील, रंजीत कनकट्टे, शोभा माने, मीनाक्षी खैरनार, विजया नागटिळक, विश्वनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते.

अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प

राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 हजार  वृक्ष लागवड करण्याचा संकल्प मराठवाडा ग्रामीण विकास संघाच्या वतीने अरुण पवार यांनी केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यातील 5 ते 6 फूट उंचीच्या 500 झाडांचे (Pimpri) वाटप चार टँकर पूजन कार्यक्रमात करण्यात आले. उर्वरित वृक्षारोपण पाऊस झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.