Alandi : प्रक्षाळपूजे वेळी लिंबू पाण्याने माऊलींच्या संजीवन समाधीवर जलाभिषेक

एमपीसी न्यूज -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या (Alandi)निमित्त दि.19 रोजी आज मार्गशीर्ष शु.सप्तमी या दिवशी प्रक्षाळपूजे वेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीवर सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत हजारो भाविकांनी लिंबू,पाणी मिश्रित (व पिठीसाखर मिश्रीत)पाण्याने जलाभिषेक केला.

सकाळी 11:30 ते दुपारी 1 पर्यंत श्रीं ना पवमान अभिषेक करून आरती करण्यात आली व नैवेद्य देण्यात आला.दुपारी एक नंतर भाविकांसाठी श्रींचे संजीवन समाधी दर्शन चालू करण्यात आले आहे.

Pimpri : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे 20 वर्षानंतर होणार प्रकाशन

रात्री 8 वा. धुपारती होणार असून रात्री 10 ते 12 यावेळेत गावकरी भजन संपन्न होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.