Pimpri : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे 20 वर्षानंतर होणार प्रकाशन

एमपीसी न्यूज – ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या (Pimpri )प्रथम आवृत्तीचे प्रकाशन 2003 मध्ये झाले होते. त्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर हे पुस्तक वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराचे अभ्यासक ,लेखक श्रीकांत चौगुले (Pimpri )यांनी अनेक ज्येष्ठांच्या मुलाखती व लिखित साधनांचे संशोधन करून गाव ते महानगर हे पुस्तक साकारले होते. त्याचा प्रकाशन समारंभ 18 एप्रिल 2003 रोजी ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते झाला होता. यावेळी पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ श्री घारे हे अध्यक्षस्थानी होते.

PCMC : नाेकर भरतीतील पात्र उमदेवार रुजू हाेण्यास सुरूवात; 21 जण रुजू

दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन चिंचवड येथील समरसता गुरुकुलम येथे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या हस्ते तसेच शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे हे प्रमुख पाहुणे तर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

आजवर पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून अनेकांना उपयोग झाला. शहराचा विकास होतो आहे. लोकसंख्या वाढते आहे. अनेक अभ्यासक आणि जिज्ञासू वाचकांकडून सातत्याने पुस्तकाची मागणी होत असल्याने, नवीन आवृत्ती केली. लवकरच गेल्या दोन दशकाच्या वाटचालीचा समावेश करून, सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार असल्याचे लेखक श्रीकांत चौगुले यांनी सांगितले.

शहरात नव्याने येणाऱ्यांना शहराची माहिती व्हावी. या परिसराचा इतिहास ज्ञात व्हावा. यासाठी नवी आवृत्ती केल्याचे संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे यांनी कळविले आहे.तीनशे पंचवीस पृष्ठांचे हे पुस्तक असून त्यामध्ये अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. प्रकाशनाच्या निमित्ताने विशेष सवलतीत ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.