Pimpri : पवनामाई जलदिंडीला उद्यापासून सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदी प्रदूषणमुक्तीसाठी(Pimpri) जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे उद्या (बुधवार) पासून पवनामाई जलदिंडी काढली जाणार आहे. निगडीतील भक्तीशक्ती उद्यानापासून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दिंडीचे प्रस्थान होईल.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा (Pimpri)नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85 किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते. मागील 11 वर्षांपासून जलदिंडी काढली जाते. यंदाच्या दिंडीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

Pune : शहराच्या किमान तापमानात किंचीत वाढ, थंडी कमी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

पवनानगर येथे नदी पूजन करून दिंडीला प्रारंभ होईल. शिवली घाट, आर्डव घाट, थुगाव घाट, जलपूजन आणि त्यानंतर ग्रामस्थ व शाळा भेट होईल. शिवणे घाट, बेबडओहोळ किंवा सोमाटणे घाट, साळुंब्रे घाट, गुरुवारी साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीमध्ये सभा, जलदिंडी आढावा घेतला जाणार आहे. साळुंब्रे घाट येथून दिंडी मार्गस्थ होणार आहे. चिंचवड येथे जलमैत्री व पर्यावरण पुरस्कार वितरण आणि दिंडीचा समारोप होणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.