PCMC : नाेकर भरतीतील पात्र उमदेवार रुजू हाेण्यास सुरूवात; 21 जण रुजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध (PCMC)विभागातील 388 जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांची पालिका सेवेत रुजू हाेण्याची प्रतिक्षा संपली असून उमेदवार महापालिकेत रुजू हाेण्यास सुरूवात झाली आहे.साेमवारी एकाच दिवशी 21 जण पालिका सेवेत रुजू झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 मध्ये (PCMC)साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, हे मनुष्यबळ कमी पडत असल्याने महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.

Pune : शहराच्या किमान तापमानात किंचीत वाढ, थंडी कमी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

अपुरे मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचा-यांच्या जिवावर श्रीमंत महापालिकेचा सध्या कारभार सुरू आहे. राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे 2023 मध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेतली. 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर ऑगस्टमध्ये उमेदवारांचा निकाल जाहीर झाला.

पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची 29 नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीत पात्र उमेदवारांची नावे अंतिम करून यादी प्रसिद्ध केली.

अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अँनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांवर पिंपरी-चिंचवड पालिकेला या भरतीनंत मनुष्यबळ मिळणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.