Pune : शहराच्या किमान तापमानात किंचीत वाढ, थंडी कमी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांपासून गारठलेल्या (Pune )पुण्याच्या किमान तापमानात आज (दि.19) तीन अंसानी वाढ झाली आहे. किमान तापमान 12 अंशावरून 15 अंशावर पोहचले आहे. कमाल तापमान आज 27.4 अंश नोदवले गेले आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कायम असल्यामुळे(Pune) महाराष्ट्रात थंड वातावरण होते. मात्र, दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बुधवारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Earthauake : चीनमध्ये मध्यरात्री भूकंप; आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. या वाऱ्यामुळे गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात 21 डिसेंबरनंतर वाढ होण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम आहे. मध्य प्रदेश मार्गे थंड वारे राज्यात येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. राज्याच्या बहुतेक भागात रात्री उशिरा किंवा पहाटे धुके पडण्याचा अंदाज ही हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.