Pune : नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या फटाका स्टॉलला महापालिकेने ठोठावला दंड

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या कालावधीत नदीपात्रात (Pune)उभारलेल्या फटाका स्टॉल धारकांना स्टॉल काढल्यानंतर राडारोडा तेथेच टाकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे.

 

अस्वच्छता केल्याप्रकरणी नदीपात्रातील 34 स्टॉलधारकांच्या अनामत रकमेतून दंडाची रक्कम वसूल करावी, असा प्रस्ताव कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला दिला आहे.

Pune : शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी लाच मागणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

दिवाळीच्या कालावधीत मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून (Pune)नदीपात्रात फटाका विक्री स्टॉल उभारण्यास परवानगी दिली होती. ऑनलाइन लिलाव पद्धतीने गाळे भाड्याने देण्यात आले होते.

स्टॉलधारकांनी दैनंदिन कचरा घंटागाडीला द्यावा, अशी लेखी सूचना त्यांना देण्यात आली होती. मात्र स्टॉलच्या आजूबाजूचा परिसर आणि स्टॉल खालील बाजूला साठणारा कचरा तसाच ठेवण्यात आला होता. दिवाळीनंतर एक एक स्टॉल काढण्यात आले; मात्र स्टॉलधारकांकडून कचरा तसाच ठेवण्यात आला होता.

स्टॉलधारकांकडून राडारोडा तसाच टाकण्यात आल्यानंतर त्यांच्यावर यापूर्वीच दंडात्मक कारवाई करण्यात येणार होती. या सर्व 34 स्टॉलधारकांना एकत्रित दंड ठोठावण्यात येणार होता. त्याला स्टॉलधारकांनी ही सहमती दर्शविली होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता दंड भरणार नाही, असा पवित्रा स्टॉलधारकांनी घेतल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या नियमानुसार स्टॉलधारकांना किमान पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडे दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतरच त्यांना अनामत रक्कम मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.