PCMC Helath: शहरात उभारणार 79 आरोग्यवर्धिनी केंद्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना घराजवळ (PCMC Helath)उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 79 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

मोठ्या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरात (PCMC Helath)आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, एक किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा 25 ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरू करण्याचे नियोजन केले होते.

Pune : यावर्षी पुणेकरांनी सायबर फसवणूकीत गमावले तब्बल 41 कोटी

यामधील दापोडी, काळेवाडी, रावेत आणि दिघी या चार ठिकाणी क्लिनिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. या क्लिनिकचे काम पूर्ण होताच हे आरोग्यवर्धिनी केंद्रात समायोजन करण्यात येणार आहे.

एका आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना तीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीनेही मदत मिळणार आहे. नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळाल्याने रुग्णालयावरील ताण कमी होईल. गरजूंना लवकर उपचार देणे शक्य होईल. शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पुरविणे शक्य होईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.