Photo Feature: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची काही विलोभनीय क्षणचित्रे

एमपीसी न्यूज – तुकोबाची कान्ता सांगे लोकापासी । जातो पंढरीसी स्वामी माझा ।।फुटकाच विणा त्याला दोन तारा । घाली येरझरा पंढरीसी ।। तुका म्हणे कान्ते ऐसे न बोलावे ।शरण जावे विठोबासी ।।

अशा या तुकोबांची पालखी ने आज पुंढपुरकडे प्रस्थान ठेवले. टाळ-मृदगांने भारावलेले वातावरण, विठोबाच्या जयघोषात रमलेले वारकरी अशा रम्य वातावरणात 338 व्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे.

लहान-थोर,स्त्री पुरुष जातपात असा कोणताही भेद न मानत केवळ माऊली ही एकच ओळख सोबत घेऊन आज पालखीने पंढरपूरची वाट चालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पंढरीच्या राजाकडे मनासारखा पाऊस पडू देरे बाबा हे एकच साकडे घालण्यात आले.

(छायाचित्र सौजन्य – ज्ञानबातुकाराम फेसबुक पेज)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.