Diwali Pahat : दिवाळी पहाट कार्यक्रमात सुरेल गायनाला मिळाली दाद

एमपीसी न्यूज : थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित नादवेध प्रस्तुत दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडच्या पैस रंगमंच येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गायिका शर्मिला शिंदे, गायक तुषार रिठे यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जागो मोहन प्यारे’ ही भैरव रागातील बंदीश शर्मिला शिंदे यांनी सादर केली. गायक तुषार रिठे यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठ्ठल आवडी’ हे यमन रागावर आधारित गीत प्रकार तसेच किशोर कुमार यांच्या गीतांना उजाळा दिला. तर, गायिका – शर्मिला शिंदे यांनी ‘झिनी झिनी बाजे बीन’, ’घट घट मे पंछी बोलता’, ‘थकले रे नंदलाला‘ आदी सुरेल रचना सादर केल्या. बाल गायिका- स्वरा शिंदे हिने उबंटू चित्रपटातील ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत गाऊन रसिकांची दाद मिळवली. बाल गायिका आरंभी रिठे हिने ‘रुणु झुणू रे भ्रमरा’, ‘जब दीप जले आना’ हे गीत गायले. सह गायिका वैष्णवी कुलकर्णी हिने –‘माय भवानी, झाले समाधान’ हे गीत गाऊन रसिकांना मंत्र मुग्ध केले.

Bhama Askhed : भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊसच्या खर्चात 22 कोटींची वाढ

कार्यक्रमाचे निवेदन स्मिता देशपांडे यांनी तर साथ संगत (Diwali Pahat) तबला निलेश शिंदे, तालवाद्यसाथ अनिरुद्ध देवगावकर, सलील देवगावकर यांनी केली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बाळकृष्ण पवार, प्रभाकर पवार, युसुफअली शेख, ऋतुजा दिवेकर, शिवम नडगीर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.