DL RC Validity News : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना यांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली

एमपीसी न्यूज – ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना आणि फिटनेस प्रमाणपत्र यांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार ज्यांच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान समाप्त होणार आहे किंवा झाली आहे त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे. हि कागदपत्र आता 31 मार्च 2021 पर्यंत वैध धरली जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.