Alandi News : कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी मध्ये सर्वत्र ज्ञानोबा माऊलीचा जयघोष

एमपीसी न्यूज : आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त माऊलींच्या दर्शनाकरिता लाखो वारकरी भाविक भक्त अलंकापुरी मध्ये दाखल झाले आहेत. (Alandi News) कार्तिकी यात्रे निमित्त प्रदक्षणा रस्त्यासह सर्वत्र शहरात दिंड्याचा ज्ञानोबा माऊली हा नामघोष पसरला होता. 

लहानांसह ज्येष्ठ वृद्ध वारकरी भाविक ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात तल्लीन होत नृत्य करत होते, फुगडी खेळत होते.डोक्यावर तुळशी वृंदावन तसेच श्री विठ्ठल,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची मुर्ती घेत,टाळ, मृदुंगाच्या गजरात, खांद्यावर पताका घेत ज्ञानोबा माऊलीं तुकाराम असा जयघोष करत नगरप्रदक्षणा पूर्ण करत होते.इंद्रायणी घाटावरती एकादशी निमित्त स्नाना करीता प्रचंड गर्दी झालेली होती.

PCMC News : विनापरवाना वृक्षतोड संदर्भात उद्यान विभागातील दोघांवर सेवानिलंबनाची कारवाई

इंद्रायणी घाट दुतर्फा वारकरी भाविक भक्तांनी भरून गेला होता.गेल्या वर्षी पेक्षा यंदा शहरात मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी झालेली दिसून येत होती. दुपारी दीड च्या सुमारास हरिनामाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नगरप्रदक्षणेस निघाली होती.(Alandi News) पालखी नगरप्रदक्षणेस निघते वेळी मंदिरा मध्ये तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.माऊलींची पालखी फुलांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आली होती.हजेरी मारुती मंदिरात पावणे तीन च्या सुमारास पालखी पोहचली.त्यांतनंतर तेथून  प्रस्थान करून संध्याकाळी 7 च्या सुमारास पालखी माऊली मंदिरात पोहचली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.