PCMC News : विनापरवाना वृक्षतोड संदर्भात उद्यान विभागातील तिघांवर सेवानिलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्यान विभागातील एक अधिकारी व दोन माळी यांना विनापरवाना वृक्षतोड केल्या प्रकरणी सेवानिलंबित केले आहे.(PCMC News) त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत.

संजीव राक्षे, असिस्टंट हॉर्टिकल्चर सुपरवायझर, मच्छिंद्र कडाळे, माळी (तदर्थ उद्यान सहाय्यक), भरत पारखी, माळी (तदर्थ उद्यान सहाय्यक) यांच्या बाबत आदेश दिले आहेत. त्यांनी हे आदेश शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी दिलेले आहेत.

संजीव राक्षे असिस्टंट हॉर्टिकल्चर सुपरवायझर यांच्याकडे दिव्याखालील फांद्या छाटणी करण्याकरिता संबंधित उद्यान सहाय्यक यांनी वृक्षतोड कर्मचारी मिळण्याबाबतची मागणी केलेली होती. परंतु त्यांनी परस्पर उद्यानातील वृक्षतोड/ छाटणी करण्याकरिता खाजगी यंत्रणेची कर्मचारी व वाहन पाठवून वरिष्ठांना पूर्वसूचना/ पूर्वकल्पना न देता मनपा स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, निगडी येथील मीना परवाना ग्लॅडिसिडिया – 3 वाळलेले वृक्ष काढले, कांचन – 8, वर्षाच्या 14 फांद्या, कॅशिया – 4 वृक्षांच्या 5 फांद्या, स्प्याथोडिया – एक फांदी, हाय टेशन च्या वायर दिशेच्या कडेच्या दोन फांद्या काढल्या. तसेच महात्मा फुले उद्यान,  दत्त नगर, चिंचवड येथील उद्यानामधील असलेल्या फायकस – 14 वृक्षाच्या 31 फांद्या व इतर वृक्षांची तोडणी विनापरवाना करून व वृक्षतोडीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनावर नियमानुसार गुन्हा दाखल न करता त्यातील लाकडे सेक्टर नंबर 27 येतील नर्सरी मध्ये जमा करून घेतले. तसेच ते वाहन सोडून दिल्या बाबतची माहिती उप उद्यान, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग  यांच्या अहवालाद्वारे उप आयुक्त उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दर्शनास आणून दिलेली आहे.

Pune university : विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमांमार्फत तक्रारी प्राप्त झालेले आहेत. राक्षे यांचे उपरोक्त गैरवर्तन हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे जबाबदारपणाचे असून त्यांची एकंदरीत सचोटी, संशयास्पद असून त्यांनी कर्तव्यामध्ये नितांत सचोटी व कर्तव्य परायणता न ठेवता कर्तव्यात कसूर करून स्वहितासाठी, स्वतःच्या फायदा होण्याच्या दृष्टीने गंभीर आर्थिक स्वरूपाचे गैरकृत्य केल्याची बाब प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.(PCMC News) त्यामुळे आयुक्तांनी राक्षे यांना या आदेशाच्या दिनांकापासून सेवा निलंबित करून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

मच्छिंद्र कडाळे, माळी (तदर्थ उद्यान सहाय्यक), भरत पारखी, माळी (तदर्थ उद्यान सहाय्यक) या दोघांना याच प्रकरणात याच कारणावरून आयुक्तांनी या आदेशाच्या दिनांकापासून सेवा निलंबित करून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.