Pune university : विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे मागील निवडणुकीच्या (Pune university) तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात परंतु शांततापूर्ण आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभेवर पदवीधर मतदारांमधून एकूण दहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. 1 जून पासून सुरू झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत विद्यापीठाचे दोनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत होते.

अतिशय कडेकोट बंदोबस्तात व नियोजनबध्द पद्धतीने ही प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाकडून पार पडली. रविवारी सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune university) केंद्रासह सर्वच केंद्रांवर मोठा उत्साह होता. दुपारच्या वेळातही अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मतदानासाठी येत होते. संध्याकाळी पुन्हा हा ओघ थोडा वाढत अखेर पाच वाजता केंद्रांवर शांततापूर्ण वातावरण पार पडले. मुख्य म्हणजे तरुण विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनीही या मतदानाला हजेरी लावली होती.

AAP Party office : निगडी प्राधिकरणात आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मतदान टक्केवारी
पुणे
पुरुष 7528
महिला 3700
एकूण 11228
टक्केवारी 24.85

अहमदनगर
पुरुष 4896
महिला 1687
एकूण 6583
टक्केवारी 24.3

नाशिक
पुरुष 4176
महिला 1876
एकूण 6049
टक्केवारी 37.14

सिल्वासा
पुरुष 1
महिला 5
एकूण 6
टक्केवारी 42.86

एकूण
पुरुष 16601
महिला 7265
एकूण 23866
टक्केवारी 26.85

 

विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधरांसाठीच्या निवडणुका आज 71 मतदान केंद्रांवर अतिशय शांततेत पार पडल्या. सर्व केंद्रप्रमुख, त्यांच्या संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाचे शिक्षक-अधिकारी-कर्मचारी यांनी या निवडणुका यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.(Pune university) सर्व उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे देखील मी मनःपूर्वक आभार मानतो. माननीय कुलगुरू व माननीय प्र-कुलगुरू यांचे मोलाचे मार्गदर्शन या निवडणुकीसाठी लाभले, त्यांचा मी ऋणी आहे.

डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.