Nigdi pradhikaran : निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिरामध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : श्री.गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, निसर्गराजा मित्र जीवांचे आणि प्रांत पोलिसिंग मित्र संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण (Nigdi pradhikaran) येथील गजानन महाराज मंदिरामध्ये रविवार 20 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

दिवाळी नंतर शहरातील बहुतेक रक्त पिढी मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन दर वर्षी दिवाळी नंतर आशा शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबीर आयोजित करण्याचे हे आठवे वर्ष होते. नियमित रक्तदात्यांसोबतच नवीन रक्तदात्याना प्रोत्साहन देणे तसेच महिलांनीही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन करण्याचा संस्थांचा उद्देश असतो.

Alandi News : कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी मध्ये सर्वत्र ज्ञानोबा माऊलीचा जयघोष

या वर्षी एकूण 145 जणांनी रक्तदान केले यामध्ये 38 लोकांनी पहिल्यांदाच रक्तदान करण्याची सेवा केली. तसेच 34 महिलांनीही रक्तदान केले. डी. वाय. पाटील रक्तपेढी, (Nigdi Pradhikaran) पिंपरी यांचे रक्तसंकलन करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. प्रत्येक रक्तदात्यांना भेट म्हणून गुलाबाच्या झाडाचे रोप देण्यात आले.

या शिबिराच्या आयोजनासाठी गोपाल बिरारी, नितीन चिंचवडे, उदय निकम, संदीप देशपांडे , आर एच पिसे, बी बी खडसे, डी पी हरमकर, रवी मिरजी, सागर वाघ, अतुल वाघ, अभिजीत बुधले, सचिन रंधे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.