Pimpri-Chinchwad : जागतिक स्मरण दिवस निमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उदयानात जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज : संपूर्ण जगामध्ये रस्ते अपघातात दिवसाला 3400 नागरिक मृत्युमुखी पड़तात.त्याच्या आठ टक्के नागरिक हे आपल्या भारतात आहे.म्हणजे भारत देशात दिवसाला 411 नागरिक हे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात. (Pimpri-Chinchwad) हे प्रमाण शून्यवर यावे म्हणून संपूर्ण जगामध्ये 20 नोव्हेम्बर हा दिवस जागतिक स्मरण दिवसम्हणून साजरा केला जातोय….या दिनाचे महत्व अधोरेखित करावे, नगरिकांमध्ये जनजागृती करावी म्हणून पिंपरी-चिंचवड RTO कार्यालयाने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उदयानात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.

Nigdi pradhikaran : निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिरामध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रसंगी मार्गदर्शक म्हणून युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन हे उपस्थित होते.मोटर वाहन क्षेत्रातील कार्यकर्त प्रवीण महाजन म्हणाले की,वाहन चालवतांना रस्ते वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.वाहन अधिक वेगाने चालवणे,डाव्या बाजूने ओव्हेरटेक करणे,सिग्नल लागलेला असतांना सिग्नल तोडणे, दारू पिऊन वाहन चालवणे,(Pimpri-Chinchwad) नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालवणे किवा चालवण्याचा प्रयत्न करणे,साइड मिरर न लावता,सीट बेल्ट न बांधता वाहन चालवणे अशी अनेक कारणे नमूद केली तसेच वाहनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉ. निकोलस ऑटो यांचा अपघाती मृत्यु व त्याचे रस्ता अपघात हे कारण प्रकर्षाने नमूद करून वाहन चालवतांना घ्यावयाची सुरक्षितता नमूद केली.यावेळी पिंपरी-चिंचवड़ आरटीओ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.