Karnak bridge : कर्नाक पूल पाडण्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज : मध्य रेल्वेने 27 तासांच्या ब्लॉक दरम्यान कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या करून काटेकोर नियोजनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. (Karnak bridge) 27 तासांचा ब्लॉक 19 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 11 वा पासून ते 21 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, 7वी लाईन आणि यार्डवर परीचालीत करण्यात आला.

अप आणि डाउन धिम्या मार्गावर आणि अप आणि डाउन जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक शेड्यूलपूर्वी पूर्ववत केली. पहिली लोकल ट्रेन दुपारी 3.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाणेकरीता सुटली जी कर्नाक ब्रिज डिस्मेंटलिंग साइट येथून दुपारी 4.00 वाजता पास झाली. हार्बर मार्गही वेळापत्रकाच्या आधी संध्याकाळी 5.46 वाजता पूर्ववत करण्यात आला. हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल- वडाळा लोकल वडाळा येथून 5.46 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता रवाना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून संध्याकाळी 5.52  वाजता सुटली.

7 वी लाईन आणि यार्डचे काम प्रगतीपथावर आहे आणि शेड्यूल प्लॅनपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. भूतकाळातील घडामोडींचा मागोवा घेऊन, हे मोठे कार्य पार पाडण्यासाठी (Karnak bridge) एक अभिनव नियोजन करण्यात आले. ब्लॉक असणाऱ्या दिवसापूर्वी 100 % ट्रफ आणि स्लॅब काँक्रीट काढणे आणि उपलब्ध कॉरिडॉर मार्जिनमध्ये पाथवे काढणे तसेच स्टँडबाय क्रेनमुळे वेळेआधीच काम पूर्ण करण्यास मदत झाली आहे.

Pimpri-Chinchwad : जागतिक स्मरण दिवस निमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उदयानात जनजागृती कार्यक्रम

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले की “सर्व मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने हे एक मोठे आणि आव्हानात्मक काम होते. व्यापक तयारीचे काम, नाविन्यपूर्ण योजना, सूक्ष्म नियोजन आणि स्थानीय नागरी संस्थांशी योग्य समन्वय यामुळे आम्हाला हे प्रचंड काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. अनेक मोठ्या क्षमतेच्या क्रेन आणि इतर यंत्रसामुग्रीच्या तैनातीमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि टीम वर्कमुळे हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात मदत झाली. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर कामांसाठी देखील करण्यात आला. ट्रॅक, ओएचई आणि शॅडो ब्लॉकमधील सिग्नलिंगची देखभाल, ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे 900 तासांची बचत झाली.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल, नाशिक, पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवर ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मदतकक्ष सुरू करण्यात आले होते. हे मदतकक्ष आरपीएफ आणि स्टेशन कर्मचार्‍यांच्या मदतीने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून चालवण्यात आले. महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त आरक्षण /रद्दीकरण काउंटर देखील उघडण्यात आले आहेत आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त ATVM सुविधाकारांना सेवेत आणण्यात आले आहे.

 

 

 

शॉर्ट ओरिजिनेशन, टर्मिनेशन, मेल/एक्स्प्रेस ट्रेन्सचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत घोषणा करण्यात आल्या. ब्लॉकबद्दलची माहिती आणि त्याचे परिणाम वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जसे की न्यूज चॅनेल आणि एफएम चॅनेलमध्ये आधीच प्रसिद्ध झाले होते आणि मोठ्या प्रमाणात एसएमएसद्वारे आणि ट्विटर, फेसबुक, कू, यूट्यूब आणि इंस्टाग्राम यांसारख्या मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले गेले होते.

 

 

 

मध्य रेल्वेचे अधिकारी, निरीक्षक आणि अभियंते यांच्या कार्यक्षम टीमद्वारे पर्यवेक्षण करण्यात आलेला हा महत्त्वाचा ब्लॉक पार पाडण्यासाठी मध्य रेल्वेला प्रवाशांच्या पाठिंब्याचे कौतुक आहे. आठवड्याच्या अखेरीसही पूर्ण क्षमतेने उपनगरी गाड्या चालवल्याबद्दल पश्चिम रेल्वेचे आणि ब्लॉकग्रस्त भागात अतिरिक्त बसेस चालवल्याबद्दल पालिका कौतुकास पात्र आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.