Central Railway : मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (Central Railway ) राम करण यादव यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. मुंबई विभागातील तीन, नागपूर विभागातील एक, पुणे विभागातील तीन आणि सोलापूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी (दि. 16) हा पुरस्कार सोहळा पार पडला. नोव्हेंबर ते डिसेंबर – 2023 या महिन्यात कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये संरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मुंबई विभाग

संजीत प्रसाद सिंग (ट्रेन व्यवस्थापक, पनवेल, मुंबई विभाग)

17 नोव्हेंबर 2023 रोजी डाउन मालगाडी मध्ये काम करत असताना, अप लाईनवरील जसई यार्ड आणि होल्डिंग यार्ड दरम्यान किमी 88/11-13 वर रूळाला तडा गेलेला दिसला. त्यांनी सदर माहिती संबंधितांना दिली व तडा ठीक करण्यात आला आणि ट्रेनचे परिचालन पुन्हा सुरू झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

नीरज कुमार (स्थानक उपव्यवस्थापक, पेण, मुंबई विभाग)

7 डिसेंबर 2023 रोजी पेण स्थानकावर कामगिरीवर असताना, जाणाऱ्या मालगाडीसोबत सिग्नल्सची देवाणघेवाण करताना, इंजिनच्या मागील चाकातून स्पार्क बाहेर पडताना दिसला. मालगाडी तात्काळ थांबवण्यात आली आणि तपासणी केली असता आढळून आले की ब्रेक बाइंडिंग आणि फ्लॅट टायरमुळे ट्रॅकमध्ये 12 ठिकाणी खड्डे निर्माण झाले होते. तात्काळ समस्या दूर करण्यात आली आणि मालगाडी 10 किमी प्रतितास वेग प्रतिबंधासह पुन्हा सुरू करण्यात आली. त्यांची सतर्कता आणि तत्परता यामुळे गंभीर दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

रामेश्वर मीना (तंत्रज्ञ लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई विभाग)

3 डिसेंबर 2023 रोजी, उद्योग नगरी एक्स्प्रेसच्या खालील गीअरच्या तपासणी दरम्यान, द्वितीय वातानुकूलित श्रेणीच्या तिसऱ्या चाकामध्ये एक अतिशय हलका तडा गेलेला दिसला. जो सामान्यतः दिसणे कठीण होते. ‘एडी करंट ॲरे टेस्टिंग’ द्वारे याची पुष्टी करण्यात आली. त्यांनी तत्काळ संबंधितांना सर्व माहिती दिली आणि त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली.

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांचे शक्तीप्रदर्शन

नागपूर विभाग

सुधीर भाऊदास चव्हाण (तंत्रज्ञ, नागपूर विभाग)
18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर यार्ड येथे ‘रोलिंग इन एक्झामिनेशन’ दरम्यान, शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमधील इंजिन पासूनच्या तिसऱ्या डब्ब्याची ट्रॉली तुटलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना कळवले, तसेच त्यांनी सांगितले कि, तो डब्बा वेगळा होत आला होता, त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर अपघात टळला.

पुणे विभाग

चिरंजीलाल बैरवा (रूळ व्यवस्थापक, कोरेगाव, पुणे विभाग)
16 डिसेंबर 2023 रोजी कीमॅन म्हणून त्यांच्या कर्तव्यादरम्यान, कोरेगाव – सातारा दरम्यानच्या अप मालगाडीचे वॅगन चाक रुळावरून घसरताना त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब लाल सिग्नल दाखवला आणि ट्रेन तात्काळा थांबवण्यात आली व त्यांनी सर्व संबंधितांना कळविले. त्याच्या सतर्कतेमुळे छोट्या तांत्रिक बिघाडाचे रूपांतर गंभीर अपघातात होण्यापासून रोखले गेले.

राजीव कुमार (तंत्रज्ञ, पुणे विभाग)

21 ऑगस्ट 2023 रोजी ट्रेन क्रंमाक 12150 च्या तपासणी दरम्यान, एका कोचच्या पुढील ट्रॉलीच्या उजव्या बाजूची प्राथमिक बाह्य स्प्रिंग तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना कळवले आणि तो डब्बा वेगळा झाला. त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.

निखिल कांबळे (तंत्रज्ञ, पुणे विभाग)

9 नोव्हेंबर 2023 रोजी ट्रेन क्रंमाक 02142 च्या तपासणी दरम्यान, एका डब्याच्या मागील ट्रॉलीच्या डाव्या बाजूला प्राथमिक बाह्य स्प्रिंग तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना कळवले आणि तो डब्बा वेगळा करण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.

सोलापूर विभाग

पी. जे. जिजीमोन (स्थानक उपव्यवस्थापक, कलबुर्गी, सोलापूर विभाग)

1 डिसेंबर 2023 रोजी कलबुर्गी स्थानकावरील शंटिंगच्या कामात, 07748 रिकामे रेक चालू स्थितीत शंट सिग्नल ओलांडताना दिसले. त्याने मोठ्याने ओरडून लोको पायलटला परिस्थितीची माहिती दिली आणि ट्रेन थांबवली, त्यामुळे रेक रुळावरून घसरण्यापासून वाचला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

सुनील कुमार (पॉइंट्समन, सावलगी, सोलापूर विभाग)

9 डिसेंबर 2023 रोजी सिग्नल्सची देवाणघेवाण करताना, अप ट्रेन क्रंमाक 60302 च्या आठव्या डब्यात गरम एक्सल दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याचा सिग्नल दाखवला आणि ट्रेन थांबवली व अग्नीरोधकाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. ट्रेन पुन्हा स्थानकावर पाठवण्यात आली आणि तो डब्बा वेगळा करण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

विनोद कुमार (गेटमन कलबुर्गी, सोलापूर विभाग)

20 डिसेंबर 2023 रोजी यांना मालगाडीच्या ब्रेक व्हॅनच्या बाजूने विसाव्या वॅगनमध्ये गरम एक्सल दिसला. त्यांनी तात्काळ स्थानक व्यवस्थापक, कलबुर्गी यांना माहिती दिली. कलबुरगि येथे ही वॅगन रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.