Pune : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांचे शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

मुळीक यांनी आरोग्य शिबीर भरवून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर, मोहोळ यांनी अपने अपने राम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. मोहोळ आणि मुळीक यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर हे सुद्धा लोकसभेला इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

Sant Tukaram Maharaj Sansthan : किर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करू नका; जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे आवाहन

दरम्यान, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्याच ताब्यात राहणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माहाविकास आघाडीत खटके उडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसतर्फे 20 जणांनी पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.