Jaipur : डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा ‘ग्लोबल ब्राह्मण लीडर’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा ‘ग्लोबल ब्राह्मण लीडर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या हस्ते सर्व ब्राह्मण महासभा राजस्थान यांच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा राजस्थान, जयपूर येथे नुकताच पार पडला.

यावेळी सर्व ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष सुरेश मिश्रा, दक्षिण काली मंदिर हरिद्वाराचे पीठाधीश्वर परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी, खासदार अशोक वाजपेयी,  रामचरण बोहरा, डॉ. महेश जोशी, राजस्थानचे माजी मंत्री अरुण चतुर्वेदी, वरिष्ठ पत्रकार  गोपाल शर्मा उपस्थित होते. जागतिक स्तरावर डॉ. कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या एकता आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

 

राज्यपाल कलराज मिश्रा म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. ब्रह्मोद्योगच्या माध्यमातून त्यांनी समाजातील हजारो उद्योजकांना जोडून ठेवले आहे. समाजातील तरुण वर्गाला व्यापार आणि उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करत मदत केली आहे. असे कार्य देशभर हिरीरीने होण्याची आवश्यकता आहे.

 

डॉ. गोविंद कुलकर्णी ब्राह्मण समाजासाठी समर्पित कार्यकर्ते आहेत. तसेच  ते गुणवान आणि धनवान आहेत, असे गौरवोद्गार स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी यांनी काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.