Jaipur : करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष (Jaipur) सुखदेव सिंह गोगामेडी यांची आज राजधानी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुखदेव सिंग गोगामेडी यांची श्यामनगर भागातील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सुखदेव सिंग यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(अशाप्रकारे झाली सुखदेव सिंग यांची हत्या)

त्यांच्या सोबत असलेले 2 सुरक्षा रक्षक देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. स्कॉर्पियो गाडीमधून 3 मारेकरी त्यांच्या घरी दाखल झाले होते.

Chinchwad : शेल्टर असोसिएट्स व मनपा च्या वतीने जागतिक शौचालय दिन साजरा

मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. परिस्थिती (Jaipur) हाताळण्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सुखदेव सिंग यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जयपूर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये 1 मारेकरी मारला गेला आहे. रोहित गोदारा याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.