Alandi : संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीच्या 342 ज्यादा गाड्या

एमपीसी न्यूज – कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Alandi )संजीवन समाधी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत पीएमपी कडून 342 ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

कार्तिकी एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी अलंकापुरी आळंदीमध्ये सात ते आठ लाख भाविक येणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून भाविक पुणे शहरात येतात. तिथून ते आळंदी येथे दाखल होतात. त्यामुळे आळंदी येथे येण्यासाठी शहराच्या विविध भागातून अतिरिक्त बस गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Jaipur : करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या

रात्री दहा नंतर तिकीट दरापेक्षा पाच रुपये ज्यादा (Alandi )तिकीट दर आकारणी केली जाणार आहे. तसेच यात्रा कालावधीत रात्री दहा नंतर ज्यादा बसमधून प्रवास करताना पासचा वापर करता येणार नाही.

या ठिकाणावरून सुटणार ज्यादा गाड्या

स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी या ठिकाणावरून आळंदीसाठी ज्यादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आळंदी येथे जाता यावे तसेच तिथे गेलेल्या भाविकांना आपल्या वेळेत माघारी फिरता यावे यासाठी पीएमपी प्रशासनाने ही सोय केली आहे.

आळंदी येथून जाणाऱ्या एसटी व पीएमपीएमएल बस थांबे

योगीराज चौकातून सर्व ठिकाणी जाण्याकरिता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस साठी बस थांबा करण्यात आला आहे.

डुडुळगाव जकात नाका येथे देहूगावकडे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि पीएमपीएमएल बससाठी थांबा करण्यात आला आहे.

चऱ्होली फाटा येथे पुणे बाजूकडे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि पीएमपीएमएल बससाठी थांबा करण्यात आला आहे.

हा वाहतूक बदल पाच डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत असेल दरम्यान दिंडीतील वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना प्रवेश दिला जाईल.आपत्कालीन परिस्थितीत श्री ज्ञानेश्वर मंदिरातून पान दरवाजा ते संत कबीर बुवा मठासमोरून राम घाट, इंद्रायणी नदी घाटाकडे जाता येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.