Sammed Shikhar : सम्मेद शिखरसाठी उपोषणाला बसलेले जैन मुनी समर्थ सागर यांचे निधन

एमपीसी न्यूज : समेद शिखरचे सरकारीकरण होण्यापासून (Sammed Shikhar) वाचवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आणखी एका जैन साधूंनी आपले प्राण त्यागले आहे. जयपूरच्या सांगानेर येथील संघी जी जैन मंदिरात 3 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले मुनी समर्थ सागर यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. याआधी मुनी सुज्ञेय सागर महाराज यांनी समेद शिखरासाठी बलिदान दिले होते.

Pimpri : वल्लभनगर बस स्टॉपवरून दिड लाखांचा गांजा जप्त

मुनी समर्थ सागर महाराज यांचे गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता (Sammed Shikhar) निधन झाले. मुनी सुज्ञेय सागर महाराज यांच्या निधनानंतर अन्नपाणी सोडून आमरण उपोषणाला बसले होते. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता संघीजी जैन मंदिरातून मुनिश्रींची डोल यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने जैन भाविक सहभागी झाले आणि आचार्य सुनील सागर महाराज यांच्या सहवासात जैन परंपरेनुसार त्यांचे शरीर पंचभूतात विलीन झाले. सांगणेर येथील जैन समाजाच्या मंदिरात समेद शिखर वाचवण्यासाठी मुनी सुज्ञसागर उपोषणाला बसले होते. नऊ दिवसांनी म्हणजे मंगळवारी मुनी सुग्यसागर यांचेही निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.