Mahalunge : दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पायी रस्ता ओलांडत असताना 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात  रविवारी (दि.25) कान्होकरवस्ती मोई ते निघोजे या मार्गावर घडला.

Dehuroad : बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

याप्रकरणी दुचाकी चालक योगेश गजाननराव मोदी (रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला असून संतोष लक्ष्मण गवारी (वय 45 रा.मोई, खेड) यांनी म्हाळुंगे (Mahalunge) एमआयीडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांची 70 वर्षाची आई ही रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत फिर्यादीच्या आईला धडक दिली. यात फिर्यादीच्या आईला डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.